ऊस बिलांसाठी २६ ऑगस्ट पासून आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

189

गोंडा : बजाज ग्रुपच्या कुंदरखी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केले.

काँग्रेसच्या जिल्हा कमिटीचे अध्यक्ष विरेंद्र पटेल यांच्या नेतृ्त्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्याला तातडीने शेतकऱ्यांचे पैसे देण्यासंबंधी आदेश दिले जावेत. शेतकऱ्यांची सर्व ऊस बिले त्वरीत मिळाली पाहिजेत.

कुंदरखी साखर कारखान्याने जर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही तर जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली २६ ऑगस्ट २०२१ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला. जिल्हा प्रवक्ता शिव कुमार दुबे यांनी सांगितले की, त्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. त्यांनी कारखान्याला यासंदर्भात निर्देश दिले जातील. लवकरच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे असे दुबे म्हणाले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here