इथेनॉल, मिथेनॉल अथवा विजेवर चालणाऱ्या बांधकाम उपकरणांच्या वाहनांसाठी व्याज सवलतीचा विचार

नवी दिल्ली : केंद्र सरकार इथेनॉल, मिथेनॉल अथवा विजेवर चालणाऱ्या बांधकाम उपकरणांच्या वाहनांसाठीव्याज सवलत योजना लागू करण्याची शक्यता तपासत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केले. ते म्हणाले की, सध्याची बांधकाम उपकरणे डिझेलवर चालतात. ती हायड्रोजन, एलएनजी आणि विजेवर काम करावीत अशी माझी इच्छा आहे. गडकरी यांनी टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव २०२३ मध्ये सांगितले की, मी एक असे धोरण आणण्याचा विचार करीत आहे, ज्या अंतर्गत स्वस्त दरात कर्जे उपलब्ध करून दिली जातील.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गडकरी यांनी, गेल्या नऊ वर्षात झालेल्या विकासामुळे लोक पुन्हा एकदा मोदी सरकारला मते देतील, असा विश्वास व्यक्त केला. २०२४ आम्ही जिंकणार आहोत (आम्ही २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकू.) गडकरी म्हणाले की, आम्ही आमचे काम करण्यावर विश्वास ठेवतो. आणि भविष्याबाबत फार काही विचार करत नाही. ते म्हणाले की, जेव्हा विकासकाामांचा मुद्दा येतो, तेव्हा सरकारने एनडीए आणि इतर राज्यांदरम्यान कोणताही भेदभाव केलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here