ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, ऑनलाईन नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

लखनौ : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऑनलाईन घोषणापत्र भरण्यासाठी आणखी एक मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या ऊस विभाग आणि साखर उद्योग विभागाचे अप्पर सचिव, ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी ही माहिती दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन घोषणापत्र भरण्यासाठीची मुदत १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत अंतिम असेल असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी ही मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, खरीप पिकांच्या कापणीमध्ये शेतकरी व्यस्त असल्याने काही शेतकऱ्यांना घोषणापत्र भरता आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यावेळी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. आता २०२१-२२ या गळीत हंगामासाठीचे ऑनलानई घोषणापत्र भरली जात आहेत. ऊस आयुक्तांनी शेतकऱ्यांना घोषणापत्र तातडीने भरावे असे आवाहन केले आहे. त्यानंतर घोषणापत्र भरून घेतले जाणार नाही. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तोडणी मिळण्यात अडचणी येतील असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here