इंधन म्हणून इथेनॉल वापराने शेतकऱ्यांमध्ये समृद्धी येईल : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूरपासून पश्चिम बंगाल तसेच बिहार, सिलिगुडीपर्यंतच्या ३२,००० कोटी रुपये खर्चाच्या ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेच्या निर्मितीची घोषणा केली. यावेळी गडकरी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी त्यांनी ७,६१० कोटी रुपयांच्या १६ राष्ट्रीय महामार्ग योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, मी जे सांगतो, ते पूर्ण करतो. कारण भाजप सरकार जी आश्वासने देते, ती पूर्ण करते.

गडकरी म्हणाले की अलिकडेच त्यांनी एका वाहन कारखान्याचा पाहणी दौरा केला. हे वाहन उत्पादक दुचाकी वाहन निर्माते आहेत. इथेनॉलवर चालू शकतील अशा वाहनांची ते निर्मिती करीत आहेत. इंधन म्हणून इथेनॉल वापराने शेतकऱ्यांमध्ये समृद्धी येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या आपण ८ लाख कोटी रुपये इंधन आयातीवर खर्च करतो. अशीच गती राहिली तर पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी २५ लाख कोटी रुपये खर्च येईल. मात्र आपण इथेनॉल वापर सुरू केला तर हे पैसे शेतकऱ्यांकडे येऊ शकतील असे गडकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here