MSM Malaysia ला Coca-Cola कंपनीकडून RM290 मिलियनच्या साखर पुरवठ्याचे कंत्राट

क्वालालंपूर : एमएसएम मलेशिया होल्डिंग Bhdची सहायक कंपनी, MSM Prai Bhd (MSM Prai)ला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उत्पादन अशा दोन्ही ठिकाणी कोका-कोला कंपनीसोबत (Coca-Cola) जवळपास RM290 मिलियन किमतीची प्रक्रियाकृत साखर पुरवठ्याचे कंत्राट (refined sugar supply contract) मिळाले आहे. रिफाइंड साखर उत्पादक MSM मलेशियाने म्हटले आहे की, या करारामुळे कंपनी आशियामध्ये मलेशियातील अग्रेसर आणि प्रख्यात रिफाइंडय साखर उत्पादक कंपनीच्या रुपात स्वतःचे स्थान मजबुत केले आहे.

समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैयद फिजल सैयद मोहम्मद यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठा शितपेयाचा ब्रँड असलेल्या कोका-कोलाच्या पुरवठा साखळीचा हिस्सा बनण्याची संधी हा ‘MSM’च्या निर्यातीसाठीच्या ब्ल्यू प्रिंटचा भाग आहे. या संधीमुळे ‘MSM’ समुहाला २०२१ मध्ये एक बदल करण्यची संधी मिळाली आहे. सर्व क्षेत्रातील व्यापक बाजारपेठेत ‘MSM’ च्या विस्ताराला गती देण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ‘MSM’ने म्हटले आहे की, कंपनी दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून कोका-कोलाला देशांतर्गत स्तरावर सेवा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here