Philippines मध्ये साखर आयात प्रक्रियेबाबत वाद-विवाद सुरूच

मनीला : राष्ट्रपती फर्डिनेंड “बोंगबोंग” मार्कोस ज्युनिअर यांनी निवडक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून साखर आयातीचे निर्देश दिले आहेत, असे फिलिपाइन्स कृषी विभागाचे वरिष्ठ अवर सचिव डोमिंगो पांगनिबन यांनी सीनेट ब्लू रिबन पॅनल समोर सांगितले. सेन फ्रान्सिस टॉलेंटिनो यांनी पांगनिबन यांना कॅबिनेट बैठकीनंतर मार्कोस यांनी त्यांना जे सांगितले, ते स्पष्ट करण्यास बजावले आहे. तेव्हा पांगनिबन म्हणाले की, राष्ट्रपतींनी त्यांना साखरेची निवडक आयातदारांच्या माध्यमातून आयात करण्याचे निर्देश दिले आहेत.

पांगनिबन यांनी समितीला सांगितले की, मार्कोस यांनी त्यांना फोन करून देशात साखरेच्या महागाईचा दर अधिक असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रपतींनी बाजारात याची किंमत कमी करण्यासाठी साखरेची तत्काळ आयात करण्याबाबतची शिफारस करण्यासाठी प्रेरीत करण्यात आले. पांगनिबन पुढे म्हणाले की, दोन दिवसांनंतर त्यांनी (मार्कोस) पुन्हा अनेक साखर आयातदारांसोबत बैठक घेतली आणि एक तासाच्या विचार-विनिमयानंतर मला साखर आयातीचे निर्देश दिले.

एसआरएचे प्रमुख, पाब्लो लुइस अजकोना यांनी सांगितले की, मला याबाबत कोणतीही वैयक्तिक माहिती नाही की हे कसे घडले. फेब्रुवारी महिन्यात पांगनिबन यांनी मलाकानांगमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मार्कोस यांनी महागाई कमी करणे आणि साखरेचा बफर स्टॉक वाढविण्यासाठी त्यांनी तीन सक्षम आणि मान्यताप्राप्त कंपन्यांकडून साखर आयातीची प्रक्रिया पुढे नेण्यास सांगितली होती. या तीन कंपन्यांमध्ये सक्डेन फिलीपाइन्स इंक, एडिसन ली मार्केटिंग कॉर्प आणि ऑल एशियन काउंटरट्रेड इंक यांचा समावेश होता. मात्र, या कंपन्यांच्या योग्यतेबाबत होन्टिवरोस यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here