ऊसाचे वजन करण्यावरून कारखान्यावर वादंग

101

मुजफ्फरनगर: खाईखेडीमधील उत्तम साखर कारखान्यात नंबर डावलून थेट ऊस वजन करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांशी वादाचा प्रकारही घडला. याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कारखान्यात रात्री तेजलहेडा गावातील शेतकरी आपली उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन घेऊन आला होता. तो ट्रॉली थांबवून घरी निघून गेला. सकाळी आठ वाजता येऊन त्या शेतकऱ्याने स्वतःच्या उसाचे पहिल्यांदा वजन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे गेटवरील अधिकारी सत्यवान सिंह यांनी त्याला अडवले. त्यावेळी त्याने शिविगाळ करून धक्काबुक्कीही केली. कारखान्याचे इतर कर्मचारी तेथे आल्यानंतर त्याने सोबतच्या अन्य शेतकऱ्यांना बोलावून गोंधळ घातला. ऊस वजन काटाही बंद पाडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे आले. त्यावेळी सर्वजण पळून गेले. कारखान्याचे सुरक्षा अधिकारी दिनेश कर्मा, कारखान्याचे अधिकारी संजय शर्मा आदींनी पुरकाजी पोलीस ठाण्यात जाऊन तेजलहेडा येथील सुरेश पालसह इतर लोकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here