फिजीत साखरेच्या दर निश्चितीवरून वादंग

285

सुवा : साखरेसह कोणत्याही वस्तूच्या दराच्या नियमनासाठी प्राधिकरण जबाबदार नसल्याचे फिजीचे पंतप्रधान आणि साखर मंत्री वोरेके बेनिमारामा यांनी स्पष्ट केले. नॅशनल फेडरेशन पार्टीचे खासदार, पियो टिकोदुआदुआ यांनी फिजी शुगर कॉर्पोरेशनद्वारे साखर मंत्रालयाच्या साखरेच्या दरात १०० टक्के वाढीची मागणी करताना साखर मंत्रालयाशी चर्चा केली होती काय अशी विचारणा पंतप्रधान बैनिमारामा यांच्याकडे केली होती. त्यानंतर पंतप्रधान बेनिमारामा यांनी सांगितले की, एफसीसीसीने याबाबतची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया सर्व संबंधित घटकांच्या हिताचा विचार कले. त्यामध्ये साखर मंत्रालयालयालाही आपल्या सूचना देण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. एनएफपीने कोणताही प्रस्ताव दिला नाही ही अतिशय दुःखदायक बाब आहे. यामध्ये काहीही नवे नाही असे पंतप्रधान बैनिमारामा यांनी म्हटले आहे.
एफएससीने एक किलो साखरेची किंमत १.४० डॉलरवरुन वाढवून २.८९ डॉलर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दोन किलो साखरेचा दर २.८१ डॉलरवरुन ५.७८ डॉलर, चार किलो साखरेची किंमत ५.६१ डॉलरवरुन ११.५६ डॉलर आणि २५ किलो साखरेचा दर ३४.१७ डॉलरवरुन ७२.७३ डॉलर करावा अशी मागणी केली आहे.

टिकोदुआदुआ यांनी पंतप्रधान बैनिमारामा यांना विचारले की, जर लोकांना प्रत्येक वस्तूच्या दराबाबत अवघड स्थिती असेल तर या दरवाढीला मंजूरी देऊन लोकांच्या अडचणी का वाढवल्या जात आहेत ? एफएससीला पश्चिम विभागात फक्त एक कारखाना ठेवायचा आहे, याची पंतप्रधानांना माहिती आहे का ? अशी विचारणा एनएफपीचे नेते प्रा. बिमान प्रसाद यांनीही केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here