केनियामध्ये साखर आयात धोरणावरून वाद

नैरोबी (केनिया) : केनिया मध्ये सरकारकडून साखर आयातीला परवानगी दिली गेल्यामुळे ऊस शेतकरी नाराज आहेत. तसेच त्यांनी सरकारकडे कंपन्यांना दिलेल्या साखर आयातीच्या लायसेन्स संदर्भातील आरोपांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

केनिया शुगरकेन ग्रोअर्स असोसिएशन चे महासचिव रिचर्ड ओगेंडो यांनी सोमवारी सांगितले की, कृषि मंत्रालयद्वारा 50,000 टन साखरेच्या आयातीची परवानगी देणे चिंताजनक आहे. स्थानिक साखरेच्या पुरवठ्यामध्ये चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे आयातकांना लायसेन्स देण्याची गरज नाही. त्यांनी या प्रकरणात कृषी एवं पशुधन कैबिनेट मंत्री मेवांगी किंजुरी यांच्यावर साखर उद्योगाला पुनर्जिवित करण्याच्या प्रयत्नांना विफल करण्याचा आरोप लावला आणि सांगितले की, कृषी मंत्रालयाने साखर संचालनालय माध्यमातून साखर आयातकांच्या मोठ्या संख्येने आयात लायसेन्स दिलेली आहेत. असोसिएशनने इतर प्रकरणांबाबत कैबिनेट मंत्री फ्रेड मतिआंगी यांच्याकडे या बाबात ताबडतोब तपासणी करण्याची मागणी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here