सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांना पुनर्जीवित केले जाईल : मुख्यमंत्री

विजयवाडा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाई एस जगमोहन रेड्डी यांनी सांगितले की, शेतकरी दिवसाच्या निमित्ताने 8 जुलै ला 54.6 करोड रुपयांची थकबाकी भागवली जाईल. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी ताडपल्ली मध्ये आपल्या कार्यालयात आयोजित सभेमध्ये सांगितले की, सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांना पुनर्जीवित केले जाईल. त्यांनी अधिकार्‍यांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री म्हणाले की, जुलै मध्ये कारखान्याकडून एकूण 54.6 करोड रुपयांचे देय भागवले जाईल. ज्यामुळे राज्यातील जवळपास 50,000 शेतकर्‍यांना लाभ मिळेल. विजयराम गजपति कारखाना (8.41 करोड), चोडावरम कारखाना (22.12 करोड) इतिकोप्पका (10.56 करोड) तंद्रा साखर कारखाना (8.88 करोड) आणि अनकापल्ले कारखाना (4.03 करोड) देय आहेत. ते म्हणाले, मंत्र्यांचा एक समूह सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांचा अभ्यास करेल आणि आपला अहवाल प्रस्तुत करेल. रेड्डी यांनी अधिकार्‍यांना याबाबत 15 ऑगस्ट पर्यंत एक व्यापक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here