अहमदनगर जिल्ह्यात साखर कामगारांसाठी समन्वय समिती स्थापन

अहमदनगर : जिल्ह्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांतील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा साखर कामगार समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अहमदनगर येथील कॉ. आनंदराव वायकर यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून कामगारांना पगारवाढ, थकीत वेतन, सेवानिवृत्तीवेतन, इतर प्रलंबित मागण्या व चालू स्थितीतील समस्या सोडविण्याचे काम केले जाणार आहे.

अहमदनगर येथील श्रमिक भवनात रविवारी झालेल्या बैठकीस जिल्ह्यात साखर कारखान्यांचे ५० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी दर महिन्याला जिल्ह्यातील एका साखर कारखान्यांवर जाऊन, तेथील स्थानिक प्रश्नांचा आढावा घेणे, एखाद्या कारखान्यावर स्थानिक प्रश्नांसाठी आंदोलन चालू असल्यास समन्वय समिती आंदोलनात सहभाग घेईल, असे सर्वानुमते ठरले. निवडलेली कार्यकारिणी अशी : सल्लागार – अविनाश आपटे, सरचिटणीस – डी. निमसे, कार्याध्यक्ष – नितीन गुरसळ, संदीप मालुंजकर, उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर, मनोहर शिंदे, अर्जुन दुशिंग, एम. म्हस्के, शेषनारायण, बाळकृष्ण पुरोहित, सहचिटणीस रवि तांबे, अनिल गुणवरे, विजय देशमुख, वेणूनाथ बोळींज, खजिनदार अशोकराव पवार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here