साओ पाउलो : पराना आणि मिनस गेरैस (Parana and Minas Gerais) या राज्यांसह ब्राझीलच्या मध्य-दक्षिण क्षेत्रामध्ये मक्का, कॉफी आणि ऊस पिकाला आगामी काही दिवसांत हलक्या दव पडण्याच्या प्रकाराचा (धुके) फटका बसू शकतो, अशी शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्यामुळे मक्का, कॉफी, ऊस या पिकांच्या उत्पादनाबद्दलची चिंता वाढली आहे. या पिकांवर होणारा थंडीचा परिणाम मर्यादीत असेल असे अनुमान वर्तविण्यात आले आहे. मात्र, या थंडीच्या लाटेमुळे तापमान खूप कमी होणार नाही अशी शक्यताही असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
याबाबत रॉयटर्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, थंडीच्या या हलक्या लाटेमुळे काही ठिकाणी शेतांमध्ये आणि झाडांचा वरचा भाग, पानांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या क्लायमेटेम्पो (Weather forecaster Climatempo)ने म्हटले आहे की, पराना आणि साओ पाउलो राज्यातील अल्ता पॉलिस्टा आणि मोगियाना या कॉफी क्षेत्रांमध्येही दव पडण्याची शक्यता आहे, जिथे ऊस देखील पिकवला जातो. त्याच्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.