देशामध्ये 76,472 कोरोनाचे नवे रुग्ण, एकूण आकडा 34 लाखावर

133

नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. गेल्या 24 तासात देशामध्ये सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने जगामध्ये बनलेले गेल्या 25 दिवसांचे रेकॉर्ड तोडले आहे. इथे एका दिवसात 76,472 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 1021 लोकांचा मृत्यु झाला आहे.

आरोग्य विभगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, आतापर्यंत कोरोनाचे 34लाख 63 हजार 972 रुग्ण समोर आले आहेत. तर 26,48,998 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 62,550 लोकांचा मृत्यु झाला आहे.

दरम्यान, कोरोना रिकवरी रेटमध्येही वाढ झाली आहे. हा आकडा वाढून 76 टक्क्यावर पोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांचा विचार केल्यास गेल्या 24 तासामध्ये 65,050 इतके नवे कोरोनाग्रस्त उपचाराअंती ठीक झाले आहेत. हे नवे रेकॉर्ड आहे. सरकार कोरोना कमी होणे आणि वेळेत कोरोनाची लक्षणे लक्षात यावीत यासाठी रोज होणार्‍या टेस्टच्या संख्येत वाढ करत आहे. तसेच अनेक महत्वाची पावले ही उचलली जात आहेत.

देशामध्ये संक्रमणामुळे होणार्‍या मृत्यु दरात घट झाली आहे. हे प्रमाण आता केवळ 1.81 टक्के राहिले आहे. आकड्यांनुसार देशामध्ये केवळ 7,52,424 लोकांवर उपचार सुरु आहेत. जे प्रमाण 21.72 टक्के आहे. देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा सात ऑगस्टला 20 लाखावर गेला होता तर 23 ऑगस्टला हा आकडा 30 लाखावर गेला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here