कोरोनाचा कहर, २४ तासात ४,१२,२६२ नवे रुग्ण

108

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे थैमान वाढू लागले आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा देशात एका दिवसात ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४ लाख १२ हजार २६२ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच देशातील एकूण संक्रमितांची संख्या २ कोटी १ लाख ७७ हजार ४१० झाली आहे. सद्यस्थितीत देशात ३५ लाख ६६ हजार ३९८ सक्रिय रुग्ण आहेत.

देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ९८० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या फटक्यात जीव गमावलेल्यांची संख्या २ लाख ३० हजार १६८ झाली आहे. आतापर्यंत १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून देशात आजवर १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here