कोरोनामुळे उच्चांकी ४५२९ मृत्यू, नव्या २,६७,३३४ रुग्णांचा आढळ

नवी दिल्ली : भारतात कोरोना महामारीचा फैलाव सुरूच आहे. कोरोना रुग्ण आढळण्याच्या दैनंदिन संख्येत थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, दररोजच्या मृतांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ४,५२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जगभरातील कोणत्याही एका देशात २४ तासांत झालेली ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे.
दरम्यान, गेल्या दिवसभरात २,६७,३३४ नव्या रुग्णांचा आढळ झाला आहे. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या २,५४,९६,३३० झाली आहे. देशात सद्यस्थितीत ३२,२६,७१९ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

याशिवाय गेल्या २४ तासात ३ लाख ८९ हजार ८५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १३,१२,१५५ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत १८,५८,०९,३०२ जणांचा लस देण्यात आली आहे. दिवसभरात २०,०८,२९६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. भारतातील पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण झाली असून हा दर आता १३.३१ टक्क्यांवर आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here