कोरोनाचा धसका, देशात ३.८२ लाख नवे रुग्ण, ३७८० जणांचा मृत्यू

97

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत नवे ३.८२ लाख रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनामुळे ३७८० जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत २,२६,१८८ जणांचा बळी घेतला आहे. तर एका दिवसात ३,८२,३१५ नवे रुग्ण आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात आता एकूण २,०६,६५,१४८ कोरोना रुग्ण झाले आहेत. सद्यस्थितीत देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३४,८७,२२९ झाली असून त्याची संक्रमितांशी टक्केवारी १६.८७ इतकी आहे. तर कोरोनापासून बरे होण्याचा दर ८२.०३ टक्क्यांवर आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण १,६९,५१, ७३१ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर मृत्यूदर घटून १.०९ टक्क्यावर आला आहे. देशात गेल्यावर्षी ७ ऑगस्ट रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर पोहोचली होती. तर २३ ऑगस्ट रोजी ती ३० लाखांवर पोहोचली. पाच सप्टेंबर रोजी देशात ४० लाख आणि १६ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्या ५० लाखांवर गेली. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने ६० लाखांचा आकडा पार केला. ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख तर १९ डिसेंबर रोजी एक कोटी रुग्णसंख्या झाली होती. भारताने ४ मे रोजी रुग्णसंख्येचा २ कोटींचा आकडा ओलांडला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सांगितले की, १ मे अखेर २९,४८,५२,०७८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १५,४१,२९९ नमुने मंगळवारी तपासण्यात आले. महाराष्ट्रात सर्वाधिक ८९१ जणांचा मृत्यू झाला असून उत्तर प्रदेशमध्ये ३५१, दिल्लीत ३३८, कर्नाटकमध्ये २८८, छत्तीसगढमध्ये २१०, पंजाबमध्ये १७३, राजस्थानमध्ये १५४, हरियाणात १५३, तामिळनाडूत १४४, झारखंडमध्ये १३२, गुजरातमध्ये १३१, पश्चिम बंगालमध्ये १०७ आणि बिहारमध्ये १०५ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाने आतापर्यंत घेतलेल्या बळींपैकी ७१,७४२ महाराष्ट्रात तर दिल्लीत १७,७५२ बळी झाले आहेत. कर्नाटकमध्ये १६,५३८ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तमीळनाडूत १४,६१२, उत्तर प्रदेशमध्ये १३,७९८, पश्चिम बंगालमध्ये ११,७७४, पंजाबमध्ये ९६४५ आणि छत्तीसगढमध्ये ९४८५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ७० टक्के मृत्यू हे इतर गंभीर आजारांनी झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here