चीनमध्ये वाढले कोरोनाचे संकट, सरकारकडून शियान शहरात लॉकडाऊन

54

बिजिंग : जगाला कोरोना महामारीकडे नेणारा चीन पुन्हा एकदा त्याच्या फेऱ्यात अडकला आहे. संक्रमण गतीने पसरू लागल्याने सरकारने कडक पावले उचलली आहेत. कोरोनाच्या नव्या लाटा रोखण्यासाठी चीनमध्ये १.३ कोटी लोकसंख्या असलेल्या, उत्तरेकडील शियान शहरात लॉकडाऊन लागू करण्या येत आहे. लोकांना अत्यंत अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावे असे सुचविण्यात आले आहे. याशिवाय खास बाबी वगळता शहरातील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे.

गुरुवारी मध्यरात्रीसून लॉकडाउन सुरू करण्यात आले. प्रत्येक घरातील एक व्यक्ती दोन दिवसातून एकदा अत्यंत गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडेल. शियानमध्ये गेल्या २४ तासात कोरोना ५४ कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १४३ झाली आहे. चीनने विंटर ऑलिम्पिक्स सुरू होणार असताना हा निर्णय घेतला आहे. सरकारने लागू केलेल्या आदेशात म्हटले आहे की लांब पल्ल्याची बस केंद्रे बंद करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी शियानबाहेर चेकपोस्ट स्थापन केले आहे. शहराबाहेर कोणीही जाणार नाही याची तरतुद केली आहे. तर शहरातील विमानतळावरुन केली जाणारी ८५ टक्के ऊड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here