कोरोनाचे संकट: भारताला मिळाली जगाची साथ

103

नवी दिल्ली : कोरोना व्हायरच्या दुसऱ्या लाटेने भारतात परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या १० दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. भारतात सद्यस्थितीत जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. ही परिस्थिती पाहून जगातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

अमेरिका, सिंगापूरसह युरोपीय देशांकडून भारताला मदत मिळत आहे. अलिकडेच हाँगकाँगच्या इंडिगो फ्लाइटमधून ३०० ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आणि वैद्यकीय उपकरणे आणण्यात आली. वायुसेनेने आपल्या सी १७ विमानातून तीन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर सिंगापूरहून एअरलिफ्ट केले. ते पनगढ येथे आणण्यात आले. तर ६ कंटेनर्स दुबईहून आणण्यात आले. याशिवाय बँकॉकमधून तीन कंटेनर्स एअरलिफ्ट केले आहेत. वायुसेनेने परदेशातूनच नव्हे तर देशातही ठिकठिकाणी मदतकार्य केले आहे.

गुरुवारी अमेरिकेतील मायामीमधून ६०० ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर भारतात आणले गेले. स्पाइस एक्स्प्रेस फ्लाइटने हे दिल्लीत आणले आहेत. अशा कठिण प्रसंगात चीननेही मदतीचा हात दिला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी एस. जयशंकर यांना मदतीबाबत पत्र पाठवले आहे. भारताला आतापर्यंत ४० देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताला सगळीकडून मदत मिळत आहे. २००४ रोजी सुनामीनंतर पहिल्यांदा भारत इतर देशांची मदत घेत आहे. जपानने भारताला ३००३ ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आणि ३०० व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केली आहे. भारत अनेक देशांना मदत करतो. आता इतर देश भराताच्या मदतीला पुढे आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here