कोरोना: घरगुती साखरेचा वापर कमी होण्याची शक्यता

129

लॉकडाऊन मुळे इतर उद्योगासह साखर उद्योगावरही खूप खोलवर परिणाम झाला आहे. घरगुती साखरेचा वापर कमी झाला आहे. अहवालानुसार या हंगामात साखरेच्या वापरामध्ये जवळपास 20 लाख टनापर्यंत घट येऊ शकते.

लॉकडाऊन चा थेट परिणाम साखर उद्योग आणि शेतकऱ्यांवर होत आहे. भारतात घरगुती वापरासाठी साखरेची विक्री होते. आणि मिठाई, फार्मासीटिकल्स आणि पेय पदार्थात साखरेचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. लॉक डाऊनमुळे हे सर्व उद्योग बंद आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवाती नंतर कोल्ड्रींक्स, मिठाई सह इतर पदार्थांसाठी साखरेला चांगली मागणी असते. आता सर्वत्र लॉक डाउन आहे. यामुळे साखरेची विक्री पूर्ण ठप्प झाली आहे. कारखान्याच्या गोदामात साखरेच्या पोत्यांचा खच पडलेला आहे.

नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रिज चे एमडी प्रकाश नाइकनवरे यांनी सांगितले की, 260 लाख टन घरगुती वापराच्या तुलनेत या वर्षी वापर 240 लाख टन होऊ शकतो. ते म्हणाले, या उन्हाळ्या दरम्यान साखरेची मागणी कमी होऊ शकते. लॉक डाऊन संपल्यानंतर पूर्ण साखर पुरवठ्याची शृंखला पुन्हा तयार करण्यासाठी 3-4 आठवडे लागतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here