थायलंडमध्ये कोरोना महामारीमुळे साखर कारखाना बंद

फेत्चाबून : थायलंडमध्ये कोरोना महामारीचा फैलाव वाढल्याने उद्योग क्षेत्राला अधिक फटका बसला आहे. थेप जिल्ह्यातील सुमारे ९० कामगारांना कोरोना झाल्याचे उघडकीस आल्यानंतर फेत्चाबून साखर कारखाना सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

थाई रुंग रुआंग इंडस्ट्री कंपनीचा हा साखर कारखाना थेप जिल्ह्यातील टॅम्बोम सी थेपमध्ये मू ९ गावात आहे. रविवारी साखर कारखान्यामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांकडून सक्रिय रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारपासून कारखाना सात दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. कोरोना संक्रमित कामगारांना उपचारासाठी थेप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर इतरांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here