कोरोना महामारी: गेल्या २४ तासांत १० हजारांहून कमी रुग्ण, ८१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतातील कोरोना संक्रमणाचा वेग मंदावत आहे. देशभरात आज दिवसभरात पुन्हा एकदा १० हजारहून कमी रुग्ण आढळले आहेत. तर शंभरपेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत आधीच्या २४ तासांत ९१२१ नवे रुग्ण आढळले. तर ८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यादरम्यान ११ हजार ८०५ रुग्ण बरे झाले आहेत. तर नव्याने ६ लाख १५ हजार ६६४ चाचण्या करण्यात आल्या. या महिन्यात चौथ्यांदा दहा हजारपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. तर दहाव्यांदा शंभरपेक्षा कमी जणांचे मृत्यू झाले आहेत ‌

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घसरण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण एक कोटी नऊ लाख २५ हजार ७१० रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी एक कोटी सहा लाख ३३ हजार २५ जण बरे झाले आहेत. ही संख्या ९७.३२ टक्के आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाख ३६ हजार ८७२ असून ती एकूण संख्येच्या १.२५ टक्के इतकी आहे. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ५५ हजार ८१३ झाली आहे. देशात आतापर्यंत २० कोटी ७३ लाख, ३२ हजार २९८ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २३ जणांचा मृत्यु झाला तर केरळ आणि पंजाबमध्ये अनुक्रमे १३ आणि १० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एकूण एक्कावन्न हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तमीळनाडू आणि कर्नाटकात प्रत्येकी बारा हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रत्येकी दहा हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात अनुक्रमे आठ हजार आणि सात हजार रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोना लसीकरण मोहीमेत देशाने प्राधान्यक्रम राखला आहे. तीन जानेवारी रोजी सीरम इन्स्टिट्यूट चर्या कोविशिल्ड आणि स्वदेशी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजूरी देण्यात आली होती. १६ जानेवारी रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ८७ लाख २० हजार ८२२ लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here