जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे की, जेव्हा जगाला वाटेल की कोरोना महामारी संपुष्टात आणावी, तेव्हाच ती नष्ट होईल. या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व सामुग्री आपल्याजवळ आहे. हे आपल्याच हातात आहे असे घेब्रेयेसस यांनी सांगितले.
आम्ही याची चाचणी घेऊ शकतो आणि त्याचा वापर करू शकतो असे ते म्हणाले. गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओने जवळपास ४० लाक नव्या कोरोना रुग्णांची नोंदणी केली आहे. चार आठवड्यांमध्ये साधारणत: सहा विभागांमध्ये कोविड १९च्या संक्रमणामध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत आफ्रिकेतील मृत्यूच्या प्रमाणातही ८० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात आढळून येत असलेल्या विषाणूमध्ये डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव अधिक आहे. भारताता आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये या व्हेरियंटने अधिक नुकसान केले होते. कोरोना व्हायरस आपले रुप बदलत असल्याचा इशारा याआधीच डब्ल्यूएचओने दिला असून आजवर चार वेगवेगळ्या रुपात हा विषाणू आढळून आला आहे.
जगातील सर्व देशांमध्ये सप्टेंबर अखेरीस दहा टक्के, डिसेंबरअखेरीस चाळीस टक्के आणि पुढील वर्षात सत्तर टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे असा डब्ल्यूएचओचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link