कोरोना महामारी लवकरच होणार नष्ट, संशोधनातून खुलासा

कोरोना महामारीची सध्याची लाट लवकरच संपणार आहे का ? याविषयी अलिकडेच झालेल्या संशोधनातून सकारात्मक उत्तर मिळत आहे. ज्या पद्धतीने ओम्रीकॉन व्हायरस पसरला, मात्र, गेल्यावेळच्या लाटेच्या तुलनेत याचा प्रभाव भारतात दिसू शकलेला नाही. त्यामुळे या महामारीचा अंत आता जवळ आल्याची शक्यता आहे. लसीकरणामुळे जनतेमध्ये जादा प्रतिकारशक्ती (हार्ड इम्युनिटी) निर्माण झाली आहे. त्यामुळे कोविड महामारीचा प्रभाव आता दिसू शकला नाही.

जगभरातील डझनभरहून अधिक विद्यापीठांतील संशोधकांसोबतच पाटणा विद्यापीठाच्या प्राणी शास्त्र विभागाच्या शिक्षकांनी केलेल्या संशोधनातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. या संशोधननुसार, नियमितपणे गेल्या सहा महिन्यांत अथवा एक वर्षाच्या बुस्टर डोसच्या व्यवस्थेने फ्लूसोबतच कोविड १९ला रोखण्यासाठी निर्माण झालेली अनोखी स्थिती दिसून आली आहे. ओम्रीकॉनचे बहुतांश रुग्ण एसिम्पोमॅटिक्स होते. यामध्ये हॉस्पिटलायझेशनची गरज भासत नाही. अशा स्थितीत ओम्रीकॉनच्या वाढत्या संक्रमणानंतरही महामारीची अखेर जवळ आल्याची शक्यता आहे. लसीकरणामुळे समुहाची अप्रत्यक्षरित्या इम्युनिटी वाढली आहे. इंटरनॅशनल जर्नल एन्व्हायरमेंट रिसर्चच्या ताज्या अहवालात या SARSCov-2 म्यूटेशनच्या पेपरमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here