महाराष्ट्रात कोरोना घटला, मात्र अहमदनगरने वाढवली चिंता

महाराष्ट्रात कोरोनाची लाट कमी होत असल्याचे दिसून आले असेल तीर काही जिल्ह्यात अद्याप याचा प्रभाव कायम आहे. मंगळवारी राज्यात २४०१ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६५,६४,९१५ झाली आहे. तर गेल्या २४ तासात २,८४० जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात सद्यस्थितीत ३३,१५९ सक्रीय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अहमदनगरातील १० जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात कोविडची स्थिती नियंत्रणात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सक्रीय रुग्णसंख्याही कमी आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात एका दिवसात ४०० ते ५०० रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी येथे ३९७ रुग्ण सापडले. मुंबईनंतर या जिल्ह्यात कोविडचा सर्वाधिक फैलाव दिसून आला आहे.

गेल्या पाच दिवसात २,२७७ रुग्ण दिसून आले आहेत. तर सरासरी ४५५ रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यात हा दर ४.२८ टक्के नोंदवला गेला आहे. जिल्हा प्रशासनाने ४ ऑक्टोबरपासून ६१ गावांमध्ये लॉकडाऊन जारी केला आहे. दहा दिवसांसाठी लॉकडाऊन असेल असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here