कोरोना नियंत्रणाबाहेर: गेल्या २४ तासात उच्चांकी २.१७ लाख रुग्ण, ११८५ जणांचा मृत्यू

111

नई दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे दिसून येत आहे. देशभरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी पुन्हा कोरोना रुग्णांची उच्चांकी संख्या पहायला मिळाली. गेल्या २४ तासांत २ लाख १७ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. देशात आजवरची ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. तर शुक्रवारी सुमारे १२०० लोकांचा मृत्यूही झाला. या वर्षातील ही सर्वात मोठी संख्या आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २,१७,३५३ नवे रुग्ण आढळले आहेत. सलग दुसऱ्यांदा दोन लाखांवर रुग्ण आढळले. शुक्रवारी आढळलेल्या नव्या रुग्णसंख्येनंतर आता देशात एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी ४२ लाख ९१ हजार ९१७ झाली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे मृ्त्यू झालेल्यांची संख्या ११८५ झाली आहे. ही यावर्षातील सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे. गेल्या २४ तासात १ लाख १८ हजार ३०२ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले. आतापर्यंत १ कोटी २५ लाख ४७ हजार ८६६ जण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत देशात १५ लाख ६९ हजार ७९३ सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २६ कोटी ३४ लाख ७६ हजार ६२५ जणांची चाचणी घेण्यात आली आहे. काल दिवसभरात १४ लाख ७३ हजार २१० चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here