नोटांमधूनही कोरोनाचा फैलाव होवू शकतो का? वाचा आरबीआय ने दिलेले उत्तर

153

नवी दिल्ली: नोटांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होत नाही असा विचार जर तुम्ही करत असाल, तर ते चुकीचे आहे. नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा बैक्टेरिया किंवा वायरस पसरु शकतो. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरार्थ आरबीआय ने एका मेलमध्ये अप्रत्यक्ष रुपात याबाबत सांगण्यात आले आहे. तसेच आरबीआय यांनी सांगितले की, लोकांनी नोटांऐवजी जास्तीत जास्त डिजिटल च्या माध्यमातून पैसे भागवले पाहिजेत.

CAIT यांनी गेल्या 9 मार्च ला आर्थिक मंत्री निर्मला सितारामन यांना एक पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रामध्ये CAIT यांनी नोट बॅक्टेरिया आणि वायरस चे वाहक आहेत किंवा नाहीत, हे स्पष्ट करण्याचा आग्रह केला होता. आर्थिक मंत्रालयाने, या प्रश्‍नाला आरबीआय ला पाठवले होते, ज्याला उत्तर देताना आरबीआय ने शनिवारी एका मेलच्या माध्यमातून हा संकेत दिला की, नोटांमुळे वायरस पसरु शकतो.

आरबीआय ने CAIT ला पाठवलेल्या आपल्या उत्तरात सांगितले की, कोरोना वायरस महामारीला पसरण्यापासून रोखण्यासाठी लोक आपल्या घरातूनच मोबाइल बँकिंग, इंटरनेट बैकिंग, कार्ड यांसारख्या ऑनलाइन चॅनल्सच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने पैसे भागवू शकतात आणि नोटांचा वापर करणे किंवा एटीएम मधून रोख पैसे काढण्यापासून वाचू शकतात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here