कोरोनाचा तडाखा, देशात नवे ३.६८ लाख रुग्ण, ३४१७ जणांचा मृत्यू

99

नवी दिल्ली : कोरोनापासून रविवारी काहीसा दिलासा मिळाला. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले. देशात सध्या ३४,१३,६४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात १२,१०, ३४७ जणांना लस देण्यात आली आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या १२ दिवसांपासून दररोज ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तर एक दिवस ४ लाख रुग्ण आढळले होते. यांदरम्यान रविवारी काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले. देशात गेल्या २४ तासात ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले तर या कालावधीत कोरोनाने ३४१७ जणांचा बळी घेतला.

उपलब्ध आकडेवारीनुसार देशात सध्या ३४,१३,६४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात १२,१०,३४७ जणांना लस देण्यात आली आहे. देशातील एकूण संक्रमितांची संख्या आता २ कोटींपर्यंत पोहोचली आहे. देशातील १२ राज्यांमध्ये संक्रमणाची स्थिती गंभीर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १५० जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचा दर १५ टक्क्यांहून अधिक आहे तर २५० जिल्ह्यांमध्ये १० ते १५ टक्के संक्रमण दर आहे.

देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्रात रविवारी ५६,६४७ नवे रुग्ण आढळले तर ६६९ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण संक्रमितांची संख्या ४७,२२,४०१ झाली असून ७०,२८४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ५१,३५६ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्या ६,६८३५३ जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत कोरोनाचे ३,६७२ नवे रुग्ण आढळले असून एकूण संक्रमितांची संख्या ६,५६,२०४ झाली आहे. तर याच कालावधीत ७९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून एकूण १३,३३० जणांना जीव गमवावा लागला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत ५७,३४२ जणांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या २४ तासात २८,६३६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

बिहारमध्ये ९७ मृत्यू, सुशील मोदींच्या भावाचे निधन
बिहारमध्ये गेल्या २४ तासात कोरोनाने माजी उपमुख्यमंत्री, भाजपचे खासदार सुशील मोदी यांच्या लहान भावासह ९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात एकूण २,७३९ जणांचा मृत्यू झाला असून १३,५३४ नवे रुग्ण आढळले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये २९० मृत्यू, ३०,९८३ नवे रुग्ण
उत्तर प्रदेशमध्ये रविवारी कोरोना संक्रमित २९० रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे ३०,९८३ रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत १३,१६२ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात एकूण रुग्णसंख्या १३,१३,३६१ झाली आहे. गेल्या २४ तासात ३६,६५० जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here