कोरोनाची सूनामी, एका दिवसात ३,७,२५७ नवे रुग्ण, ३६४५ जणांचा मृत्यू

85

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची त्सुनामी देशभर पसरली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाने संक्रमित झालेल्यांची संख्या ३,७९,२५७ झाली आहे. तर एका दिवसात ३६४५ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या संख्येने कोरोना संक्रमित आढळले आहेत.

आजच्या आकडेवारीनंतर एकूण संक्रमितांची संख्या १,८३,७६,५२४ झाली आहे. तर एकूण २,०४,८३२ जणांचा मृत्यू झाला. देशभरात १,५०,८६,८७८ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. आता देशातील सक्रिय संक्रमितांची संख्या ३०,८४,८१४ झाली आहे. तर आतापर्यंत १५,००,२०,६४८ जणांना लस देण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तर दिल्लीतील मृतांची संख्या तुलनेने कमी आहे. उत्तर प्रदेशनंतर आता भारताच्या दक्षिणेतील राज्ये, केरळ, कर्नाटकमध्येही कोरोना गतीने फैलावला आहे. कोरोनामुळे प्रभावित राज्यांनी कडक निर्बंध लागू करून लसीकरणाला वेग दिला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू
देशात गेल्या २४ तासात ३६४६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०३५ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर दिल्लीतील ३६८, छत्तीसगढमधील २७९, कर्नाटकमधील २२९, गुजरातमधील १७४, राजस्थानमधील ८५, पंजाबमधील १४२, हरियाणातील ९५ आणि बिहारमधील ८४ जणांचा समावेश मृतांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here