कोरोना व्हायरस : २४ तासांत नवे १६५८८ रुग्ण, १२० मृत्यू

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये गतीने वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी नवे १६५७७ रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले.

कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ११०६३४९१ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १२० अधिक लोकांचा बळी गेला आहे. देशात आतापर्यंत १.५६ लाख लोकांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १२१७९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०७५०६८० लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर कोरोनामुक्तीचा दर ९७.१७ टक्के झाला आहे. कोविड १९ मुळे झालेल्या मृत्यूचा दर १.४१ टक्के झाला आहे. दररोजच्या आकडेवारीनुसार नव्या रुग्णांची संख्या, दररोज बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत झाली आहे ‌ त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. देशात सध्या एकूण १५५९८६ लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.४० टक्के आहे.
चाचणी दरम्यान पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांची टक्केवारी १.९९ इतकी आहे. आयसीएआरने दिलेल्या माहितीनुसार देशात २५ फेब्रुवारीपर्यंत २१४६६१४६५ नमुने तपासण्यात आले असून ८३१८०७ नमुने बुधवारी तपासले आहेत.

गेल्या २४ तासांतील नवे रुग्ण : १६५७७

आतापर्यंतचे एकूण रुग्ण : ११०६३४९१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here