नवी दिल्ली : देशातील कोरोनाची लाट जवळपास थांबली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांमध्ये पहिल्यांदाच कोरोनाचे नवे ४० हजांरांहून कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात नवे ३७,१५४ रुग्ण आढळले आहेत. या काळात ३९ हजार ६४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट आता ९७.२२ टक्के झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात ७२४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता ४ लाख ८ हजार ७६४ झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्ण ३ कोटी ८ लाख ७४ हजार ३७६ झाली असून एकूण बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी १४ हजार ७१३ आहे. तर सध्या ४ लाख ५० हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ३७ कोटी ७३ लाख ५२ हजार ५०१ जणांना कोरोना विरोधी लस देण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात १२ लाख ३५ हजार २७८ जणांना लस दिली गेली. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात १४ लाख ३२ हजार चाचण्या काल दिवसभरात करण्यात आल्या. एकूण ४३ कोटी २३ लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link