भारतामध्ये झाली कोरोनाच्या नव्या स्ट्रेन ची एन्ट्री, ब्रिटेनमधून आले 6 संक्रमित प्रवासी

160

नवी दिल्ली: ब्रिटेनमध्ये हाहाकार माजवणार्‍या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पूर्ण जगात दहशत आहे. ब्रिटेनसह यूरोपीय देशांमध्ये कहर माजवणारा कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आता भारताता आला आहे. ब्रिटेनपासून परत येणारे सहा रुग्ण कोरोनाच्या या म्यूमेंट मुळे संक्रमित आहेत. या सर्व लोकांना सिंगल आयसोलेशन रुम मध्ये ठेवण्यात आले आहे. यांच्या संपर्कामध्ये आलेल्या लोंकानाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबर दरम्यान एकूण 33,000 प्रवासी यूके तून भारताच्या वेगवेगळ्या एअरपोर्ट वर आले होते, ज्यापैकी आतापर्यंत 114 कोरोना संक्रमित आढळून आले. या सैंपलला जेव्हा जिनोम सीक्वेसिंग साठी पाठवण्यात आले तेव्हा सहा जणांमध्ये हा नवा स्ट्रेन पहायला मिळाला.

यापूर्वी सोंमवारी कनाडा च्या ओंटारियोमध्ये कोरोनाच्या त्या नव्या स्ट्रेनची माहिती मिळाली. सर्वात पहिल्यांदा याची माहिती ब्रिटेनमध्ये समजले होते. इथे एक दांपत्य या आजाराने पीडित होण्याची बाब समोर आली होती. ओंटारियो च्या संयुक्त मुख्य आरोग्य चिकित्सा अधिकारी डॉ. बारबरा याफ यांनी हे सांगितले.

भारत आणि ब्रिटेन शिवाय स्पेन, स्वीडन आणि स्विटजरलैंड मध्येही नव्या कोरोनाच्या स्ट्रेन ची माहिती झाली आहे. तर फ्रान्स मध्येही कोरोनाचा नवा स्ट्रेन फैलावला आहे. याशिवाय डेनमार्क, जर्मनी, इटली, नीदरलैंडस आणि ऑस्ट्रेलिया मध्येही अनेक लोकांमध्ये कोरोंनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. तर दक्षिण अफ्रीकेमध्येही कोरोनाचा नवा स्ट्रेन मिळाला आहे. हे ब्रिटेनच्या नव्या स्ट्रेनपेक्षा वेगळेे आहे. तर कनाडा, जापान, लेबनान, सिंगापुर आणि नाइजीरिया मध्येही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here