कोरोना वायरस: प्रशासन झाले सावध, हेल्पलाइन नंबर जाहीर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने गुरुवारी कोरोना वायरस च्या भितीला दूर करण्यासाठी तसेच लोकांच्या सहकार्यासाठी सर्वच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी हेल्पलाइन नंबरची एक सूची जाहिर केली आहे.

ही सर्व माहिती केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवण्यात आली आहे. यानुसार दिल्लीसाठी 011-22307145, उत्तर प्रदेशात 18001805145, महाराष्ट्रात 020-26127394, मध्य प्रदेशात 0755-2527177, पश्‍चिम बंगालमध्ये 3323412600, हरियाणामध्ये 8558893911 आणि केरळमध्ये 04712122056 या नंबरवर डायल करु शकता. ओडिसातील लोक कोरोनावायरस बाबतीत सहकार्य मिळवण्यासाठी 9439994859 या क्रमांकावर डायल करु शकतात.

दुसरीकडे बिहार, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्किम, तेलंगाना, उत्तराखंड, दादरा और नगर हवेली, दीव और दमण, लक्षदीप आणि पाँडेचरी येथील लोक 104 वर डायल करु शकतात.

मेघालय आणि मिझोराम साठी हेल्पलाइन नंबर क्रमश: 108 आणि 102 निश्‍चीत करण्यात आला आहे. कोरोनावायरस गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीन मधील वुहान शहरात पसरला होता आणि आता हा जगातील 100 पेक्षाही अधिक देशात पसरला आहे., जागतिक स्तरावर 1,20,000 पेक्षाही अधिक लोक कोरोनाग्रस्त आहेत. भारतातही कोरोनावायरस मुळे 73 लोक बाधित झाले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here