पुणे : पुण्यात आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता राज्यातील रुग्णांची संख्या आता 42वर गेली आहे. तर अनेक परदेशी रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 147 झाली आहे.
करोना बाधित असलेली ही महिला फ्रान्सहून आली आहे. ती नेदरलँड्सलाही जाऊन आली होती. परदेशातून आल्यामुळं तिची तपासणी करण्यात आली होती. त्यात तिला करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही महिला ज्या कारमधून आली होती, त्या कारचालकाला आणि तिच्या घरातील मोलकरणीलाही नायडू रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्या दोघांचीही चाचणी सुरू आहे.
पुण्यातील ‘करोना’ग्रस्तांची संख्या ८, तर पिंपरी-चिंचवडमधील ‘करोना’ग्रस्तांची संख्या १० झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.