24 तासांमध्ये समोर आले 69,652 नवे कोरोना रुग्ण, 977 रुग्णांचा मृत्यु

109

नवी दिल्ली : देशामध्ये सध्या कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आज पुन्हा एका नव्या रेकॉर्ड सह 70 हजाराच्या जवळपास नवे रुग्ण आले आहेत. ज्यानंतर एकूण रुग्ण संख्या 28 लाख पेक्षाही अधिक झाली आहे. जर मरणार्‍यांचा विचार केला तर एक दिवसामध्ये 977 लोकांचा मृत्यु झाला आहे.

गेल्या 24 तासात 69,652 नवे कोरोनारुग्ण समोर आल्यानंतर एकूण रुग्ण संख्या 28,36,926 इथपर्यंत पोचली आहे. ज्यापैकी 20,96,665 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आणि हॉस्पीटलमधून आपल्या घरीही गेले आहेत. सध्या 6,86,395 इतके अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे मरणार्‍यांची संख्या 53,866 वर पोचली आहे.

एकूण टेस्टींगचा विचार करता दिल्लीमध्ये तीन करोड पेक्षा अधिक टेस्ट करण्यात आल्या आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च च्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आकडयांनुसार 19 ऑगस्ट पर्यंत प्रदेशात 3,26,61,252 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ज्यापैकी 9,18,470 नमुन्यांची कालच तपासणी करण्यात आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here