साखर कारखान्यात 3,300 करोड़चा घोटाळा: आमदाराचा आरोप

चंडीगढ़ (हरियाणा): हरियाणा च्या राज्य-संचालित सहकारी साखर कारखान्यांमध्ये गेल्या चार वर्षांमध्ये मोलासिस खरेदी आणि ऊसाच्या वजनातील गडबडी मुळे 3,300 करोड़ रुपयांचे नुकसान झाले आहे. महम चे निर्दलीय आमदार बलराज कुंडू यांनी हा आरोप केला.

राज्यातील भाजप जेजेपी सरकारचे समर्थन करणाऱ्या कुंडू यांनी सांगितले की, त्यांनी याबाबत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना सर्व पुरावे आणि दस्तऐवजांसह पत्र दिले होते. ज्यावर सीएम यांनी कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. कुंडू यांनी आरोप केला की, गेल्या 4 वर्षात कारखान्याच्या अनैतिक कारभारामुळे पैशाचा दुरुपयोग आणि भ्रष्टाचार मोठया प्रमाणात झाला, यामुळे महम साखर कारखान्याचे नुकसान झाले. हे नुकसान 2013 मध्ये 13 करोड़ रुपये होते, ते हंगाम 2018-19 मध्ये वाढून  94 करोड़ रुपये झाले. राज्यात अशा दहा कारखान्यांमध्ये घोटाळा झाला आहे, त्यामुळे कारखान्यांचे नुकसान होत आहे. कुंडू म्हणाले, सहकारी साखर कारखान्यात केवळ 8-9 टक्के साखर रिकवरी होते, तिथे खाजगी कारखान्यांमध्ये 12-13 टक्के रिकवरी होते. याचाच अर्थ असा की, जवळपास 25 टक्के खिशात जातो.

त्यांनी असाही आरोप केला की, 2016-2017 मध्ये 80,000 क्विंटल मोलासेस चा कोणताच हिशेब नाही. हे प्रकरणावर विधानसभेच्या बजेट सत्रातही चर्चा होणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here