कोविड 19 मुळे ब्रेक्जिट व्यापार वार्ता स्थगित

ब्रसेल्स : ब्रेक्जिट व्यापार वार्ता यूरोपीय संघाचा एक वार्ताहर कोरोनाग्रस्त आढळल्याने गुरुवारी स्थगित करण्यात आली. याबरोबरच वार्तेच्या परिणामांबाबत अनिश्‍चितता वाढली आहे, कारण कोणत्याही परीणामापर्यंत पोचण्याची कालमर्यादा जवळ येत आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये तीन प्रमुख मुद्यांवरुन मतभेद आहेत. यूरोपीय संघाचे मुख्य वार्ताहार मिशेल ब्रेनियर ने सांगितले की, ब्रिटेन चे मुख्य वार्ताहर डेविड फ्रॉस्ट यांना भेटून आम्ही आमची वार्ता थोड्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान खालच्या स्तरावर अधिकार्‍यांची वार्ता चालू राहिल. अशी आशा आहे की, व्यापार वार्ता लवकरच सुरु होईल, कारण जर चर्चा खूप वेळेपयंंत बंद राहिली तर वार्ताहरांसाठी एक जानेवारीपूर्वी कोणत्याही तडजोडीवर पोचणे कठीण होईल. यूरोपीय संघ आणि ब्रिटेन च्या दरम्यान व्यापार तडजोड एक जानेवारीपासून संपेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here