इथेनॉल क्षमता वाढीनंतर साखर कारखान्यांचे क्रेडिट रेटिंग सुधारणार: अहवाल

मुंबई : आयसीआरएने दिलेल्या एका अहवालानुसार डिस्टिलरी क्षमतेमध्ये वाढ, शुगर इन्व्हेंट्रीच्या स्थितीतील सुधारणा आणि इथेनॉल पुरवठ्याची वाढलेली क्षमता यामुळे २०२२-२३ मध्ये साखर कारखान्यांच्या क्रेडिट प्रोफाईलमध्ये (पत) सुधारणा होईल. आयसीआरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समुहाचे प्रमुख सब्यसाची मुजुमदार यांनी सांगितले की, इथेनॉल मिश्रीत पेट्रोल-ईपीबी २० करण्याच्या अनुकूल धोरणांसोबतच तेल वितरण कंपन्यांकडून (ओएमसी) अपेक्षित सोप्या खरेदी प्रक्रियेमुळे साखर कारखान्याना डिस्टिलरी क्षमतांमध्ये वाढ करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांनी सांगितले की, इथेनॉल पुरवठ्याचे परिणाम रॅम्प अप क्रेडिट प्रोफाईलवर दिसून येतील. आम्ही साखर उद्योगात उधारी आणि व्याज कमी होण्याची शक्यता पडताळत आहोत. २०२३ मध्ये या क्षेत्रातील क्रेडिट रेटिंग्ज अधिक मजबूत होतील.

केंद्र सरकारने २०२३-२४ पर्यंत पेट्रोलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रमाचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. भारतात इथेनॉल उत्पादनाची चर्चा अधिक वाढली आहे. गेल्या काही महिन्यांत यामध्ये खूप बदल झाला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाकडून मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार, २०१३-१४ या कालावधीत असलेले इथेनॉल मिश्रण १.५३ टक्क्यांवरून वाढून २०२०-२१ मध्ये ७.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here