कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

बस्ती : वॉल्टरगंज पोलिसांनी साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोपावरुन दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच ऑक्टोबर रोजी थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी दोन कर्मचारी चिमणीवर चढले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर दोघेही खाली उतरले.

गोविंद नगर शुगर मिल्स वॉल्टरगंजमध्ये एजन्सीच्यावतीने तैनात करण्यात आलेल्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी संतोष कुमार उपाध्याय यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कारखान्याचे कामगार असलेल्या संग्रामपूर येथील मणीराम मौर्य आणि कटहापूर श्रीपालपूर येथील रहिवासी सतीशचंद्र यांच्या वेतन देयतेचे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे ते दोघेही ५ ऑक्टोबर रोजी कारखान्याच्या चिमणीवर चढले. तेथून आत्महत्या करण्याची धमकी त्यांनी दिली. पोलिसांनी या फिर्यादीच्या आधारे दोघांविरोधातही भादविसं कलम ३०९ अनुसार दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here