शेतांमध्ये पाणी साचून राहण्याच्या प्रकाराने पिकांची वाढ खुंटली, शेतकरी संकटात

महाराष्ट्रात सद्यस्थितीत पाऊस कमी झाला आहे. मात्र, थांबून थांबून सुरू असलेल्या पावसामुळे संकट वाढत चालले आहे. जोरदार पावसाचा परिणाम राज्याच्या अनेक भागात दिसत आहे. शेतकऱ्यांना दुहेरी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पावसामुळे भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे. पाण्यामुळे पिके खराब होत असल्याने आपल्या कुटुंबांचे पालन-पोषण कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. भाताच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून राहण्याच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

टीव्ही९हिंदीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी जूनमध्ये पावसाच्या प्रतीक्षेत राहिले तर जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जून महिन्यात शेतकरी भात शेतीवर भर देतात. आता या पाणी साचण्याच्या प्रकाराचा परिणाम खरीपातील पिक उत्पादनावर पडेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खास करुन छोट्या शेतकऱ्यांचे, शेत जमिनीचे नुकसान सर्वाधिक झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here