क्रूड तेलाची दरवाढ : कच्चे तेल १२० डॉलर प्रती बॅरल, गाठला १० वर्षाचा उच्चांकी स्तर

रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळी अडचणीत येण्याच्या भीतीने परदेशी बाजारपेठेत कच्च्या तेलाने पुन्हा उसळी घेतली आहे. गुरुवारी कच्चे तेल दहा वर्षांच्या उच्चांकी स्तरावर, ११९.८४ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले. परदेशी बाजारात कच्चे तेल गेल्या तीन दिवसांत २० टक्क्यांनी महागले आहे. लंडनमध्ये ब्रेंट क्रूड चार टक्क्यांनी वाढून १२० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहे. बुधवारी ब्रेंट क्रूड १११ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले. तर मंगळवारी ते १०२ डॉलर प्रती बॅरल होते. सोमवारी त्याची किंमत ९८ डॉलर प्रती बॅरल होती.

रशिया हा कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. निर्बंधांमुळे हा पुरवठा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलाचे दर गगनाला भीडले आहेत. भारत जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. विदेशी बाजारातील तेजीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत इंधन दर 20 ते 22 रुपये वाढू शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, विदेशी बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल दरावर जाणवेल. हे दर २० ते २२ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. तर आयआयएफएल सिक्युरिटीजचे संशोधन उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी कच्च्या तेलाच्या किमती १२५ डॉलर प्रती बॅरल होण्याची शक्यता वर्तवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here