नवी दिल्ली : सरकारी इंधन कपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. देशाची राजधानी दिल्लीसह सर्व शहरांतील इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत आजही दर जैसे थे आहेत. २२ मे नंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात बदल झालेले नाहीत. २१ मे रोजी केंद्र सरकारने एक्साईज ड्यूटीमध्ये कपात केली होती. त्यावेळी इंधन दर बदलले होते. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर आहे. अशातच आता कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण दिसू लागली आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कच्च्या तेलाच्या दरात घसरण दिसत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मंदीचा धोका असल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी घसरतील अशी शक्यता आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये WTI Crude च्या किमती ०.९८ टक्के घसरुन ९३.७७ डॉलर प्रती बॅरलवर ट्रेड करीत आहेत. तर ब्रेंट क्रूडच्या किमती ०.७७ टक्के घसरून १०२.४ वर ट्रेड करीत आहेत. सध्या मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०२. ६३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.