कच्च्या तेलाचे दर बनले तेल कंपन्यांची डोकेदुखी, ७ वर्षात सर्वाधिक दर

नवी दिल्‍ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसारख्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर ८३ दिवसांपासून स्थिर आहेत. यादरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ७ वर्षांपासून पहिल्यांदा ९० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या आहेत. युक्रेन आणि रुस यांदरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जागतिक तेल मानक ब्रेट क्रूडचा दर वाढून ९०.०२ डॉलर प्रती बॅरलवर झाले आहेत. रशिया जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. त्यामुळे युरोपचा ऊर्जा पुरवठा खंडीत होण्याचा धोका आहे.

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ओम्रिकॉन विषाणू कमजोर असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये तेजी कायम राहील. दुसरीकडे देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किमती ८३ दिवसांपासून स्थिर आहेत. हे दर आंतरराष्ट्रीय दराशी जोडले गेले आहेत. यापूर्वी २०२० मध्ये ८२ दिवस इंधन दरात बदल झाले नव्हते. दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा दर ८६.६७ रुपये प्रती लिटर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here