लवकरच कमी होऊ शकतात पेट्रोल डिजेलच्या किंमती: मीडिया रिपोर्ट

नवी दिल्ली: कच्च्या तेलाच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घट झाली आहे. ज्यामुळे देशामध्ये पेट्रोल आणि डिजेलच्या दरामध्येही मोठी घट होण्याची शक्यता आहे. कच्चे तेल सध्या 40 डॉलर पेक्षाही खाली गेले आहे, हा जून नंतर सर्वात खालचा स्तर आहे. कोरोनाच्या कहरामुळे तेलाच्या किंमतीत मोठी घट दिसून येत आहे. भारत अधिकतर ब्रेंट क्रूड ची आयात करतो, यासाठी येणार्‍या दिवसांमध्ये पेट्रोलियम पदार्थ खूपच स्वस्त होवू शकतात.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रॅड मध्ये बुधवारी सलग सहाव्या दिवशी शांतपणे कारभार सुरु होता. तर अमेरिकेच्या लाइट क्रूड डब्ल्यूटीआय ची किंमत 36 डॉलर प्रति बॅरल वर आहे. गेल्या हंगामात ब्रेंट क्रूड 5 टक्क्यापेक्षा अधिक कमी झाले तर वेस्ट टेक्सस इंटरमिडिएट चा दर 6 टक्क्यापेक्षा अधिक कमी झाला. सप्टेंबर मध्ये आतापर्यंत डब्ल्यूटीआर चा दर जवळपास 7 डॉलर प्रति बॅरल अर्थात 16 टक्क्यापेक्षा अधिक कमी झाला आहे तर ब्रेंटचा दर 15 टक्क्यापेक्षा जास्त घसरला आहे.
आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात इंटर कांटिनेंटल एक्सचेंज वर ब्रेंट कू्ड च्या नोव्हेंबर डिलीवरी करारामध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत 0.20 टक्क्याच्या कमजोरीसह 39.70 डॉलर प्रति बॅरलप्रमाणे काम सुरु होते. तर यापूर्वी कारभारादरम्यान ब्रेंट क्रूड चा दर 39.36 डॉलर प्रति बॅरल पर्यंत घसरला.

तर डब्ल्यूटीआइ च्या ऑक्टोबर डिलीवरी वायदे करारामध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत 0.27 टक्के घटीसह 36.66 डॉलर प्रति बॅरल वर कारभार सुरु होंता तर यापूर्वी कारभारादरम्यान डब्ल्यूटीआइ चा दर 36.17 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here