अंबाजोगाई : पुढील वर्षी अंबासाखर ऊर्फ व्यंकटेश्वर साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवून प्रती दिन ३५०० मेट्रिक टन केली जाणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्री धनंजय मुंडे कारखान्याच्या सत्र समाप्तीच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, व्यंकटेश्वर सर्व्हिसेसने साखर कारखान्यातील मशीनरी खराब असतनाही पैसे कमविण्यासाठी नव्हे तर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी कारखाना चालविण्याचे आव्हान पेलले आहे.
व्यंकटेश्वर कंपनीने धाडसाने अंबासाखर कारखाना चालविण्यास घेतला. हा कारखाना कर्ज आणि जुन्या मशीनरीमुळे बंद पडला होता. कारखाना प्रशासनाने विविध कारखान्यांच्या सहयोगाने अंबाजोगाई, केजसह पूर्ण बीड जिल्ह्यातील ऊस गाळपास प्राधान्य दिले. ते म्हणाले की, व्यंकटेश्वरने २०२१-२२ या हंगामात ऊसाचे यशस्वी गाळप करून ३१ मार्चपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले दिली आहेत.