तांत्रिक बिघाडामुळे रमाला कारखान्यात गाळप बंद

रमाला (बागपत) : सहकारी क्षेत्रातील रमाला साखर कारखान्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे जवळपास 36 तासांपासून गाळप बंद आहे. यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठी उसाची मोठी अडचण उभी आहे. नाराज झालेल्या शेतकर्‍यांनी शनिवारी रात्री हायवेवर रस्ता राको करुन धरणे आंदोलन केले. पोलिसांनी शेतकर्‍यांना समजावून रास्ता रोको थांबवला. रविवारी तांत्रिक दुरुस्ती झाल्यानंतर कारखाना सुरु झाला.

शुक्रवारी रात्री 12 वाजता पावसामुळे उस पुरवठा न झाल्यामुळे कारखान्यांमध्ये ऊस उपलब्धता नव्हती. शनिवारी संध्याकाळी उस पुरवठा झाल्यानंतर कारखाना सुरु करण्यासाठी वाफ बनवली जात होती, तेवढ्यात बॉयलर मध्ये राख अडकली. यामुळे स्टीम तयार झाली नाही. यामुळे गाळप होवू शकतले नाही. कारखान्यात उस घेवून पोचलेल्या शेतकर्‍यांनी या विषयावर मोठा गोंधळ केला. हायवेवर चक्का जाम करुन रस्त्यावरच धरणे धरुन बसले. रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी लाईन लागली. पोलिसांनी कसेतरी समजावून शेतकर्‍यांना सांगून रस्ता मोकळा केला. 36 तासानंतर मोठ्या प्रयत्नानंतर दुपारी 2 वाजता कारखाना सुरु झाला. या प्रकारामुळे शेतकर्‍यांना भोंजन आणि निवासाच्या असुविधेशी संघर्ष करावा लागला. शेतकर्‍यांचा आरोप आहे की, अलीकडें कायमच कारखान्यात तांत्रिक बिघाड असतो. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. उत्तम ग्रुप चे साइट इंचार्ज अश्‍विनी कुमार यांनी सांगितले की, बॉयलर मध्ये राख होती, जी मजूरांकडून हटवून घेवून, कारखाना सुरु करण्यात आला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here