मोरना साखर कारखान्यात उस गाळप सुरु

मोरना :एका आठवड्यापासून बंद पडलेला मोरना कारखाना गाजियाबाद येथून मोठा जनरेटर मागून आणल्यानंतर सुरु झाला. तर भाजप नेत्याने इंजिनिअरर्स बरोबर चर्चा करुन लवकरच खराब झालेल्या टर्बाइन ला दुरुस्त करण्यास सांगितले. मोरना साखर कारखान्याने शेतकर्‍यांचा ऊस घेणे सुरु केले आहे.

शेतकरी साखर कारखाना मोरना चे आठवडाभरापूर्वी टर्बाइन खराब झाल्यामुळे 28 जोनवारीला कारखाना बंद पडला होता. ज्यामुळे शेतकर्‍यांचे माठे नुकसान होत होते. शेतकर्‍यांचा ऊस मोरना कारखान्यात ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये पडून वाळत होता, त्यामुळे शेतांमध्ये उसतोडणी होत नव्हती. यामुळे शेतकर्‍यांनी मोरना कारखाना परिसरात मोठा गोंधळ केला होता. शेतकरी यूनियन चे नेता तसेच भाजप नेत्यांनी डीसीओ ला बोलावून कारखाना चालवण्याबद्दल चर्चा केली.

कारखाना अधिकार्‍यांनी गाजियाबाद येथून जनरेटर आणून कारखाना सुरु केला. हे पाहण्यासाठी नमामी गंगे उपक्रमाचे सहसंयोजक डॉक्टर वीरपाल निर्वाल कारखान्यात आले. त्यांनी टर्बाइन ठीक करण्यासाठी आलेल्या इंजिनिअर्सकडून माहिती घेतली. इंजिनिअर्सनी लवकरच टर्बाइन चालू करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी वीरपाल सहरावत, आशीष निर्वाल, रामकुमार शर्मा, विजय राठी, अजय चेयरमन, राजकुमार राठी, वेदपाल कश्यप, देवेंद्र मलिक, ब्रजवीर सिंह, महेंद्र सैनी आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here