राज्यातील 112 साखर कारखान्यांना गाळप परवाना

संगमनेर : शेतकर्‍यांसाठी शाश्‍वत उत्पन्नाचे साधन असतानाही राज्यातील अनेक साखर कारखाने व त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. काटकसर व पारदर्शकतेतून त्यावर मार्ग काढणे शक्य आहे. याचा विचार करुनच राज्यातील 162 पैकी 112 साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. तसेच ऊस उत्पादकांना पहिल्या टप्प्यात ऊसाचे पेमेंट मिळण्यासाठी सहकार विभाग आग्रही आहे.

शेतकरी आणि तालुक्याचा विकास साधणारा थोरात सहकारी साखर कारखाना हा इतरांसाठी मार्गदर्शक ठरला असल्याचे उद्गार  आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवरााव कानवडे होते. ते म्हणाले, सर्वांच्या विकासाचे साधन असलेला सहकार जपायला हवा. 800 मेट्रीक टनापासून सुरुवात केलेला थोरात कारखाना आता 5500 मेट्रीक टन उत्पादन क्षमता व 30 मेगावॅट वीजनिर्मिती करतो. गायकवाड म्हणाले, मागील वर्षी राज्यात 107 लाख मेट्रीक टन साखर उत्पादन झाले असून, 23 हजार 400 कोटी रुपयांच्या एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली आहे. येणार्‍या काळात ब्राझीलच्या धर्तीवर साखर व इथेनॉल निर्मितीची सांगड घालून उत्पादन करावे लागणार आहे.

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, आम. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची प्रगती सुरु आहे. सहकार विभाग व राज्य सरकारने पाण्याचा अतिवापर टाळणार्‍या ठिबक सिंचनावरील लागवडीसाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.  यावेळी भाउसाहेब कुटे, साखर संचालक डी.बी.मुकणे, बाजीराव शिंदे, राजेंद्र देशमुख, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here