अमरावती आणि नागपूर विभागातील कारखान्यांचे गाळप संपुष्टात

पुणे : महाराष्ट्राची गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात सोलापूर, कोल्हापूर, नांदेडनंतर आता अमरावती आणि नागपूर विभागातील साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे.

नागपूर विभागातील ३ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. आता सर्व कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभागात ४.३४ लाख टन ऊस गाळप करून ३.९० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.९७ टक्के आहे. तर अमरावती विभागात २ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. आता येथील कारखानेही बंद झाले आहेत. येथे ५.८२ लाख टन ऊसाचे गाळप झाले असून ५.२० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहेत.

राज्यात १७९ साखर कारखाने बंद झाले आहेत. साखर आयुक्तालायने दिलेल्या माहितीनुसार, ५ मे २०२१ अखेर १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १००९.६१ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५९.३९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के आहे.

साखर आयु्क्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागातील ३७ कारखाने तर पुणे विभागातील २८ कारखान्यांचे गाळप संपु्ष्टात आले आहे. अहमदनगर विभागातील २२ तर औरंगाबाद विभागातील १८ कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here