रसायनाअभावी थांबू शकते साखर कारखान्याचे गाळप

164

चांदपूर(उत्तरप्रदेश) : कोरोना वायरस चा मोठा परिणाम साखर कारखान्यांवर पडू शकतो. इतर ठिकाणाहून येणार्‍या रसायनांचा पुरवठा न आल्यामुळे पुढील चार पाच दिवसात साखर कारखान्याचे गाळप थांबू शकते.

जगभरात पसरणारा कोरोना वायरस साखर कारखान्याच्या गाळपावर परिणाम करु शकतो. साखर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा चूना, सल्फर आदी केमिकल आता येवू शकत नाहीत. पीबीएस फूडस चांदपूर साखर कारखान्याचे सीजीएम टी. एस ढाका यांनी सांगितले की, साखर तयार करण्यासाठी लागणारा चूना राजस्थानातून येतो. कारोना वायरसमुळे राजस्थान बंद आहे. बाहेरच्या राज्यातून येणारे केमिकल्स आता येवू शकत नाहीत. सीजीएम म्हणाले की, गेल्या चार दिवसांपासून केमिकल ची कोणतीही गाडी आलेली नाही. ही स्थिती जर अशीच राहिली तर येणार्‍या चार पाच दिवसांमध्ये साखर कारखान्यातील गाळप बंद केले जावू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here