बीड : तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या २८ व्या ऊस गळीत हंगामाची सुरुवात शुक्रवारी महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ संचालक धैर्यशील सोळंके यांच्या उपस्थित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव घाटुळ हे होते. तर व्यासपीठावर सर्व संचालक मंडळासह युवा नेते विरेन सोळंके, कल्याण आबुज, लालासाहेव तिडके, उमाकांत सोळंके, हनुमंत नागरगोजे, परमेश्वर तिडके, कल्याण सोळंके, अन्नाभाऊ वगरे, सुभाष सोळंके, बाळासाहेब शिंदे, सतीश अंडील, कांता पाटील, दीपक लगड, भगवानराव शेळके, धर्मराज सावंत, बंकट लगड आदि उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, या हंगामात ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जादा व उच्चांकी उस दर देण्याचा निर्णय चेअरमन तथा आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतला असून त्याप्रमाणे मराठवाड्यात सर्वाधिक ऊस दर देण्याचा कारखान्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संचालक धैर्यशील सोळंके यांनी केले. चालू हंगामात ऊस उत्पादकांनी ऊस इतरत्र न देता हक्काच्या कारखान्यास द्यावा, असे आवाहनही सोळंके यांनी केले.
सोळंके म्हणाले, आता नुकताच डिस्टलरी विस्तारीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून यामुळे ऊस उत्पादकांना इतरांचे तुलनेत ऊस उत्पादकांना जास्तीचा भाव देणे शक्य होईल. हा कारखाना गेल्या २८ वर्षांपासून दिलेल्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करत असून शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासत असून प्रत्येक हंगामात ऊस उत्पादकांना जास्तीचा ऊस भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. याही वर्षी मराठवाड्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जास्त प्रती टन रुपये दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे असा उच्चांकी ऊस दर देऊन शेतकऱ्यांचे हित जोपासणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.